
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
शिबिरात झाल्या 488 रुग्णांच्या तपासण्या तर 60 रुग्णांवर होणार मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन…..लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या सौजन्याने राबवला उपक्रम, आ.प्रशांत बंब यांनीही केली नेत्रतपासणी ….
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रविवार दिनांक 15 मे रोजी आ.प्रशांत बंब यांच्या शुभहस्ते मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाट्न करण्यात आले.
दरम्यान सर्वप्रथम आ. प्रशांत बंब यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले व शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना आ.बंब म्हणाले की भाजपचे उपजिल्हाद्यक्ष अमोल जाधव व धामोरीचे उपसरपंच रवी पाटील चव्हाण यानी कोरोनोकाळानंतर जनता आर्थिक विंवचणेत असताना नेत्रतपासणी व मोतिबिंदू तपासणीचे शिबिर आयोजित केले आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे व यामधून ज्या रुग्णांना डॉक्टर ओप्रेशनचा सल्ला देतील त्यांचे औरंगाबादेत मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे असेही सांगितले.
यावेळी मर्चट बँकेचे संचालक प्रीतमकुमार मूथा,डॉ.रणजित गायकवाड,मा.बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव,बाळुशेठ मुनोत,सरपंच मीनाताई संजय पांडव,बाजार समितीचे संचालक सर्वश्री शेषराव जाधव, सुरेश जाधव,सोपान बोरकर, ग्रामपंचायत सद्यस्या शिला भगवान गाढे,ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री.राजाभाऊ गायकवाड,अशोक सौदागर,माजी उपसरपंच गणेश व्यवहारे,संजय पांडव,केशवराव पाटील चव्हाण, माजी सरपंच प्रदीप भुजबळ,रज्जाक पठाण, अभिजित माळोदे कल्पेश गायकवाड,
भाजपचे शहराद्यक्ष संतोष पाटील काळे,अक्षय चव्हाण, वाल्मिक वाकळे, छोटू पठाण, आम्मु शेख,आदिची उपस्थिती होती.
आ.प्रशांत बंब :–आज लासूर स्टेशनसह परिसरातील जनतेसाठी धामोरीचे सरपंच रवींद्र पाटील चव्हाण व भाजयुमोचे जिल्हापाद्यक्ष अमोल जाधव यानी लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या सौजन्याने हे शिबीर राबवले शिबीर यशस्वी झाले असून या शिबिरात 467 रुग्णांच्या तपासण्या झाल्या तर 60 रुग्णांवर मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन ,24,25,26, मे रोजी मोफत केले जाणार आहे