
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पंढरपूर येथे विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्या वतीने वधु वर परिचय मेळावा सालाबाद प्रमाणे कोरोना नंतर पहिल्यांदाच घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन व दिपप्रज्वलन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की समाजाच्या रचनेमध्ये सुतार समाजाचे योगदान मोलाचे आहे.
सृष्टीची निर्मिती विश्वकर्माने केली. त्याचे सर्व मनुष्य वंशीकता सुतार समाज आज पर्यंत अंगीकारत आहे.
पारंपारिक कौशल्याला आधुनिक साधनांची जोड देऊन सुतार समाजाने स्वतःबरोबर समाजाची प्रगती साधावी उद्घाटन प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक बोलत होते. तसेच समाजातील विविध क्षेत्रातील सिने अभिनेते सतीश आढवळकर, बाळासाहेब सुतार सर यांनी उत्कृष्ट नियोजन केले , विवेक मोरे, राजेंद्र सुतार, कौशल्या सुतार,या लोकमत पत्रकार बाळासाहेब सुतार छाया राऊत अमोल बेलकर सतीश जाधव सुषमा पंचाळ उर्मिला मोरे विजय मोरे सखाराम डोरले मधुकर सुतार यांचाही या कार्यक्रमानिमित्त सन्मान करण्यात आला राज्यांमधून अनेक जिल्ह्यातून सुतार समाज यांनी हजेरी लावली या मेळाव्यामध्ये तीनशेहून अधिक वधुवर सूचक आले व अनेकांची लग्न जमले व एकमेकांशी पटापटी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सुतार सर यांनी यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुकर सुतार व चित्रपट अभिनेते सतीश आडविलकर यांनी मानले.