
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
आज दी.१५/५/२०२२ राष्ट्रीय क्रांती सेने च्या औरंगाबाद येथील संपर्क कार्यालयामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री परमेश्वर मुंढे साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला… व तसेच काही पदा च्या सुद्धा नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात मा.श्री कृष्णा घुले साहेब यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव व नरेंद्र सांगळे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष या पदी निवड करण्यात आली…
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना माननीय संस्थापक परमेश्वरजी मुंडे यांनी मार्गदर्शन केले. पक्षाची पुढील कार्यपद्धती कशी असेल पक्ष कोणत्या मुद्द्यावरती काम करेल या विषय मत व्यक्त केले.ओबीसी आरक्षण, शोषित, वंचित, बहुजन शिक्षण ,महिला ,शेतकरी, या सर्व घटकासाठी पक्ष सातत्याने काम करेल.
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती यावर चर्चा करण्यात आली. भविष्यात राष्ट्रीय क्रांती सेना हा पक्ष सर्व सामान्य ,वंचित घटकाला न्याय देण्याचं काम करेल.
छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू ,आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मध्ये पुनश्च एकदा समता,न्याय,नागरिकांचे मूलभूत अधिकार, ओबीसी चे राजकिय आरक्षण टिकवणे तळागाळातील सर्व सामान्य जनतेपर्यंत जाऊन राष्ट्रीय क्रांती सेना पक्ष काम करेल असे नरेंद्र सांगळे यांनी व्यक्त व्यक्त केले केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती नवनाथ देवकते, ॲड_ रमेश ढाकणे,राम वारे पाटील, राहुल मिसाळ पाटील,शुभम वाघ, अविनाश वाघ ,आकाश कोल्हे, संभाजी बोंद्रे, समाधान गीते, आदी मान्यवर उपस्थित होते.