
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी- आकाश नामदेव माने
जालना- शहरातील रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या सोनलनगर भागात भारती गणेश सातारे वय 36, आणि त्यांची मुलगी वर्षा गणेश सातारे वय 17 या दोघी मायलेकींचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहरअली, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास सोनवले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.मायलेकीचे मृतदेह तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत.
खून झालेल्या भारती सातारे यांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात मारहाणीचे घाव आणि जखमांच्या खुणा असून अंगावर रक्त गोठलेल्या स्थितीत असल्यामुळे ही घटना पहाटेपूर्वी घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे आहे.
दरम्यान या दोघी मायलेकीचा खून कौटुंबिक वादातून झाला असावा असा संशय परिसरात व्यक्त होत आहे .मयत महिलेचे पती गणेश सातारे यास दोन पत्नी असून दोघी एकाच घरात राहत होत्या, एक पत्नी वरच्या मजल्यावर आणि मयत भारती या तळमजल्यावर राहात असल्याचे पोलिसांनी सांगितले.