
दैनिक चालू वार्ता पेठवडज प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- जगाला विश्र्वशांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध जयंती व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब रामराव पवार मित्रमंडळ कंधार यांनी खिर व थंड पाणी वाटप करत एक सामाजिक उपक्रम या मित्रमंडळी च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सर्वत्र मित्रमंडळ यांच्या उपक्रमाबद्दल स्तुती केली जात आहे. या उपक्रमासाठी सहभागी मित्रमंडळ अनिल कदम, अजय भंडारे, मद्रन कांबळे, पापीनवार सावकार, अवधूत महाराज, लखन जोंधळे, कपिल जोंधळे, किरण कदम , अमरदिप येवतीकर , नितीन, पवन ढवळे, बंटी कांबळे, या सर्व मित्रमंडळींनी परीश्रम घेऊन उपक्रमात सहभागी होऊन उपक्रम योग्य पध्दतीने राबविला.