दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
चाकूर येथील आनंद आश्रम सेवा संस्थानचे संस्थापक ह.भ.प गोविंद महाराज चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकाराम महाराज मंदीरात आज कलशारोहन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी ह.भ.प ज्ञानोबा महाराज मुडेकर यांचे कीर्तन झाले.राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष तुकाराम जाधव यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती.याप्रसंगी राज्याचे माजी राज्यमंञी बाळासाहेब जाधव,ज्येष्ठ नेते शिवानंद हेंगणे,राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ,आबा कवठे,गणपत नितळे,अंकुश बोमदरे,देवा पाटील,अजय घोरपडे आदीजण उपस्थित होते.
याप्रसंगी माजी राज्यमंञी बाळासाहेब जाधव साहेब यांचा गजानन जाधव यांनी सत्कार केला.तसेच मान्यवरांचा सत्कार यावेळी तुकाराम जाधव परिवारांच्या वतीने करण्यात आला.याप्रसंगी चाकूर व परिसरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
