दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
वडेपुरी:- वडेपुरी येथे नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते ढाकणी, वडेपुरी हरबळ रस्त्याचा उदघाटन सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शामगिर महाराज हारबळकर होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी मामा मारतळेकर, उपसभापती बळी पाटील जानापुरीकर, गजानन सुर्यवंशी, सदाशिव अंबुरे, आनंदराव पाटील ढाकणीकर, शंकर पाटील ढगे, लक्ष्मण बोडके, नरेंद्र गायकवाड, संजय पाटील शिंदे हारबळकर, खुशाल पाटील बामणीकर, कैलास पाटील जानापुरीकर, बाळासाहेब शिंदे डेरलेकर, व गावकरी मंडळी व सर्कल मधील बरेच कार्यक्रते उपस्थित होते सुत्रसंचलन विक्रम कदम सर यांनी केले.
