
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात जोरदार राडा झाला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
यावेळी काही महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचंही व्हिडिओमधून समोर आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या आहेत. इराणी यांची सकाळीच पुण्यात आगमन झालं. त्यांच्या या दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच निषेध केला आहे.