
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : ‘5G रुपाने आपला देश 5G स्टॅंडर्ड बनविण्यात आला आहे, ही बाब देशाच्या अभिमानाची आहे. ही बाब देशातील गावांना 5G तंत्रज्ञान पोहोचण्यात मोठी भूमिका निभावणार आहे.
5G तंत्रज्ञानाने देशाच्या सरकारमध्ये सकारात्मक बदल घडून येतील. शेती, आरोग्य, शिक्षण, इन्फास्ट्रक्चर क्षेत्रांमध्ये विकासाला चालना मिळेल. त्यातून सुविधा वाढतील आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील’, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरसंचार निमायक प्राधिकरण (TRAI) रौप्य महोत्सवनिमित्त व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखाली असलेल्या ८ संस्थांद्वारे विकसित केलेल्या 5G टेस्ट बेडचे उद्घाटन केले. ते म्हणाले, ‘आत्मनिर्भरता आणि निरोगी स्पर्धा समाजाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकते. त्यातील महत्वाचे उदाहरण म्हणजे टेलिकाॅम सेक्टर आहे. 2G काळातील निराशा, भ्रष्टाचार, पाॅलिसी पॅरालिसिसमधून बाहेर पडून देश 3G ते 4G आणि 5G-6G च्या दिशेने पाऊल उचलले आहेत.’