
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर : ज्येष्ठ नागरिक संघ शेटफळ हवेली यांनी खास दहावी,अकरावी,बारावी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी रविवार 22 मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळात मोफत करियर मार्गदर्शन व भव्य मेळावा “श्री भैरवनाथ मंदिर” शेटफळ हवेली येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी खास मार्गदर्शक म्हणून इंजिनियर हेमचंद्र शिंदे हे लाभणार असून ते महाराष्ट्रात प्रवेश प्रक्रिया व उत्तम करिअर मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. आजपर्यंत इंजिनियर हेमचंद्र शिंदे यांनी शेकडो विद्यार्थी घडवले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा ते प्रयत्न करत असतात. दहावी आणि बारावी करिअरच्या वाटेवरील महत्त्वाचे वळण असते आणि याच वळणावर नेमका कोणता पर्याय निवडावा हा खूप मोठा प्रश्न समस्या स्वरूपात निर्माण झालेला असतो.दहावी / बारावी चा निकाल लवकरच जाहीर होत आहे.
दहावी / बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांसमोर असतो तो म्हणजे करियर साठी कोणता पर्याय निवडावा?करियरच्या या महत्वपुर्ण टप्यावर विद्यार्थी व पालांकामध्ये अनेक संभ्रमवस्था असते. त्यामुळे पुढील अभ्यासक्रम निवडताना तज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते.
ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व विदयार्थ्यांना करियर निवडीच्या टप्यावर योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता ” करियर मार्गदर्शन मेळावा” चे आयोजन केलेले आहे. या करियर मार्गदर्शन मेळाव्यासाठी शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून अनमोल मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन शेटफळ हवेली ज्येष्ठ नागरिक संघाकडून करण्यात आले आहे.