
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
शरीर मांजरी शिवारातील विहीरीत तर मुंडके कायगावच्या गोदावरी नदीत फेकले…
गंगापूर – पैशाच्या व्यवहारावरून व वाईट शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेऊन दारु पार्टी साठी बाहेर बोलावून ५५ वर्षीय व्यक्तीचे मुंडके धडावेगळे करुन धड विहिरीत तर मुंडकं कायगांव ठोका येथील गोदावरी नदीमध्ये फेकणा-या दोन आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काही तासांतच आवळल्या यातील तिसरा आरोपी फरार झाला आहे.
तालुक्यातील मांजरी शिवारात एका ५५ वर्षीय व्यक्तीचे मुंडके धारदार शस्त्राने कापून धड तलावाच्या विहिरीत फेकल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना १७ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लक्षात आली.
याबाबत स्थानिक पोलीस पाटील यांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली असता उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोउपनि अजहर शेख पोउपनि डी. आर. औटे,आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून मुंडकं नसलेले धड बाहेर काढून येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणले असुन हा घातपात कशासाठी करण्यात आला याबाबत पोलिसांमध्ये साशंकता होती. परंतु
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण रायभान नाबदे (५५) राहणार बोलेगांव हल्ली मुक्काम अहिल्यादेवीनगर संतोषी माता मंदिर शेजारी गंगापूर हे दोन दिवसांपासून हरवले असल्याची तक्रार मुलगा रावसाहेब नाबदे यांनी सकाळी दिली होती
मालदापुर मांजरी शिवारातील पाझर तलावा शेजारील विहीरीत यातील आरोपी शुभम विनोंदकुमार नाहटा वय 23 वर्षे रा. गंगापूर, सचिन सोमीनाथ गायकवाड वय 20 वर्षे रा गंगापूर विशाल नामदेव गायकवाड यांनी पैशाच्या व्यवहारावरून नाबदेंनी वाईट शिवीगाळ केल्याने त्याचा राग मनात ठेऊन नाबदेला दारू पार्टी साठी बाहेर बोलावून त्याचा धारधार हत्याराने खुन करुन त्याचे मुंडके धडावेगळे करुन त्यांचे विना मुंडक्याचे धड वंसत कडुबा सुरासे यांचे मांजरी शिवारातील पाझर तलावाशेजारील विहीरीत टाकुन मुंडके (शिर) आणि कपडे कायगाव टोका येथील गोदावरी नदीजवळ फेकून दिले या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या खुनाच्या गुन्ह्यामधील आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे व कर्मचारी यांनी पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांचे मार्गद्शनाखाली शोध घेऊन आरोपी शुभम विनोंदकुमार नाहटा वय 23 वर्षे रा गंगापूर, सचिन सोमीनाथ गायकवाड वय 20 वर्षे रा गंगापूर यांना गुन्हाची कबुली दिल्याने ताब्यात घेऊन पो स्टे गंगापूर यांचे ताब्यात दिले व विशाल नामदेव गायकवाड हा अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे हे करत आहे.