दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी- नामदेव तैर
परतूर : ऊस गाळपाच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर आंदोलन करताना श्रीधरजवळा येथील शेतकरी.
परतूर : शेतातील उसाच्या गाळपाच्या मागणीसाठी तालुक्यातील श्रीधरजवळा येथील शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. साखर कारखान्याकडून नोंद असूनही ऊस नेला जात नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, शेतातील उसाचे गाळप करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
