
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर
पुणे : पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतल्याचं पहायला मिळालं. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
पुण्यातील बालगंधर्व चौकात महाविकास आघाडीतर्फे मूक आंदोलन सुरु आहे. तर याच वेळी पुण्यातील अल्का चौकात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक पद्धतीने आंदोलन करतांना दिसत आहेत. रविवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्याकडून मारहाण झाली होती. त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी आंदोलन करत आहे. तर महाविकास आघाडी गुंडगिरी करत असल्याचा आरोप करत भाजप रस्त्यावर आंदोलन करत आहे. दोन्ही आंदोलनाबाबत उलट सुलट राजकीय चर्चेला ऊत आला आहे.