
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
धडगांव तालुक्यातील मनवाणी खुर्द अंजन टेंबा पाडा येथे टाटा सीनी संस्थे मार्फत जलधारा (वॉश) कार्यक्रम एक दिवसीय स्वछता चौपाल गौरव यात्रा कार्यक्रम घेण्यात आला स्वच्छता चौपाल स्टॉलचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंचाच्या हस्ते करण्यात आले. तर ग्रामपंचायत अंजन टेंबा पाडा हा ओडीएफ मुक्त पाडा म्हणून घोषित करण्यात आला. या ठिकाणी 100% लोक स्वतःच्या शौचालयाचा वापर करत आहेत.
ओडीएफ फ्री पाडा वर बाल मुली यांनी सांस्कृतिक गाणेही गायले,व गावातील लोकांनी डोल ताशा वर त्यांच्या सांस्कृतिक नृत्याने आनंद साजरा केला.यावेळी क्रीडा उपक्रमही आयोजित करून विजेत्यांना बक्षीस दिले गेली.तर आलेल्या पाडा वासियांना शौचालय किट देण्यात यामध्ये शौचालय साफसफाईचा ब्रश, बादली मग, पाणी गाळणे इ.कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच, पोलीस पाटील, गावपुढारी व सदस्य खेमजी वळवी, वजिर पावरा, विलास पावरा, जामसिंग पाडवी, मंगल पाडवी,कलपेश पांडे, खेमजी वळवी, वजिर पावरा, विलास पावरा,आदी उपस्थित होऊन मार्गदर्शनही केले.