
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
बालविद्यार्थ्यांसाठी विविध संस्था,मंडळे व धार्मिक स्थळे यांनी आयोजित केलेली उन्हाळी बाल संस्कार शिबिरे यातील सर्वसमावेशक मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान मिळते या ज्ञानाच्या
आधारेच हे विद्यार्थी आपल्या उज्वल भवितव्याचा पाया रचून आपल्या ध्येयाप्रत जातात असे प्रतिपादन तालुक्यातील शिवूर येथील संत तुकाराम विद्यार्थी वसतिगृहात २५दिवशीय “बाल संस्कार “शिबिरात माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी मंगळवार(ता,१७) रोजी केले ,या संस्कार शिबिरात
शिवूर पंचक्रोशीतिल १२५विद्यार्थी सहभागी झालेले आहेत,श्री राजपूत पुढे म्हणाले की,मोबाईल,,इंटरनेट,ट्विटर,टी, व्ही, यामुळे मुले आपली संस्कृती,संस्कार,मूल्ये पार विसरून गेलेली आहेत, मोबाईल संस्कृती मुलांना विनाशाकडे नेत आहे,हे थांबविन्यासाठी अशा बाल संस्कार शिबिरांची
नितांत गरज आहे,संत तुकाराम आश्रमाचा हा अभिनव उपक्रम सर्वांना अनुकरणीय आहे,या प्रसंगी
या आश्रमाचे हं,भ,प,ज्ञानेश्वर महाराज मदाने, हं,भ,प,सारंगधर महाराज भोपळे,हं,भ,प, भगवान महाराज ठुबे,उद्धव महाराज मलिक यांच्या सह माजीसरपंच के,पी राऊत,व,बी,बी,जाधव,व गावातील जेष्ठउपस्थित होते