
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी – नवनाथ यादव
भूम:- शहरात न. प.समोर भिमकन्या कडूबाई खरात यांचा गितांचा कार्यक्रम ऑल इंडिया पॅंथर सेनेचे चंद्रमणी गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने रविवारी दि 15 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कडूबाई खरात यांचे गाणे ऐकण्यासाठी तालुक्यांतील नागरिकांसह शहरातील असंख्य महिला,तरुण वर्ग, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड, ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, विकी जावळे , कदू जानराव ,सोनम बनसोडे,अजू वाघमारे, सायरन गायकवाड , पंकज चौधरी,संतोष माने, अमोल शिंदे, विनायक वाघमारे यांच्यासह असंख्य ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.