
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्याला जाण्यापूर्वी पुण्यात एक जंगी सभा घेणार होते. शनिवार दि. २१ मे ही तारीख व नदीपात्र (भिडे पूल) हे स्थळ निश्चित करण्यात आले होते. ह्या सभेची चर्चा सर्वत्र रंगत होती. नदीपात्रातील साफसफाई व सभेची इतर तयारीही जोरात चालू होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे २१ मे रोजी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांकडून समजते. मनसे शहर पदाधिकाऱ्यांनी पावसाचे निमित्त सांगून तसे पत्र आज पोलिसांना दिले आहे.