दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
भोडणी प्रीमियर लीग 2022 झालेल्या स्पर्धेतअंतिम सामना भोडणीं वॉरियर्स विरुद्ध भोडणीं रॉयल्स यांच्यात झाला.या सामन्यांमध्ये भोडणीं रॉयल्स संघाने 2 धावांनी विजय मिळवत भोडणी परिमीयर लिगच्या पहिल्या वर्षी च्या किताबाचे मानकरी ठरले.
अंतिम सामन्यात भोडणी राॅयल्स चे कप्तान हेमंत हांगे यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी केली.अंतिम सामना खुपच चुरशीचा झाला आणि या सामन्यात भोडणी राॅयल्स संघांनी फक्त 2 धावांनी विजय मिळवला.या सामन्याचा मानकरी दादा तरंगे ठरले तर मॅन ऑफ द सीरीज चा किताब डॉ.तेजस हांगे यांनी मिळवला.
या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज आकाश हांगे तर उत्कृष्ट गोलंदाज गोवर्धन गोसावी हे ठरले. पंच म्हणून चंद्रशेखर पवळ, शेटफळ हवेली तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व राजवर्धन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय (मामा) शिंदे संतोष(बंटू) हांगे, संजय चौधरी, शिवाजी केंगार यांनी काम पाहिले. या स्पर्धेत साठी सर्व खेळाडु व प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याची सोय कै. विकास अनपट मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आली होती व चषक कै.तुषार सानप महाराष्ट्र पोलीस मित्र परिवार यांच्या वतीने देण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन इंदापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी मुजावर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते.तर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हा सचिन चौधरी, अनिल चव्हाण, विष्णू हांगे,लक्ष्मी मेडिकल, प्रशांत गोसावी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक भोडणी वारियर्स, तृतीय पारितोषिक भोडनी इंडियन, चतुर्थ पारितोषक भोडणीं सुपर किंग तर पाचवे पारितोषिक भोडणीं चॅलेंजर यांनी मिळवले.इंडियन प्रीमियर लीग च्या धर्तीवर ग्रामीण भागात अशा पद्यतीने सामने आयोजीत केल्यामुळे संयोजक विजय खटके पोलीस पाटील, संदीप गोसावी, डॉ.तेजस हांगे,आणि विकी पवळ ह्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे
