
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर
पुणे : महापालिका प्रशासनाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी 58 प्रभागातील एससी आणि एसटीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान आता महिला आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. एकूण १७३ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी २३ तर अनुसूचित जमातींसाठी २ जागा राखीव आहेत. त्यासाठीची लोकसंख्यानिहाय याद्या आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे २५ प्रभाग राखीव असणार आहेत.
पालिका निवडणुकीसाठी आयोगाने पुणे शहराची २०११ ची ३५ लाख ५६ हजार ८२४ इतकी लोकसंख्या गृहीत धरली असून, त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या ४ लाख ८० हजार १७ आहे.