
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची २२ मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. या सभेआधीच मनसेला गळती लागणार असल्याचं चित्र दिसतयं. पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे मनसे सोडणार आणि ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती आहे.
पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून निलेश माझीरे यांची ओळख आहे. ते पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष होते. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी याला कंटाळून निलेश माझीरे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. दरम्यान त्यांनी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली आहे.