
दैनिक चालू वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी-इंद्रसिंग वसावे
अन्नउत्पादक व्यवसाईकांनी ” अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत अन्न व्यवसाय करणाऱ्या उत्पादक आस्थापनांना अन्न व औषध प्रशासन , महा राज्य , नंदुरबार कार्यालयातर्फे आवाहन करण्यात येते की , सन २०२२ २०२३ या महसुल वर्षापासुन वार्षिक परतावा फॉर्म डी १ मध्ये भरण्यासाठी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर आपापल्या परवाना अर्ज करतेवेळीचा युझर आयडी व पासवर्ड वापरून https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे . त्यामुळे यावर्षापासून ग्राहकांना डी १ फॉर्म भरण्यासाठी कार्यालयात Email करणे वा कार्यालयसमक्ष येण्याची आवश्यकता नाही . तसेच अन्न व्यवसायीकांना संकेतस्थळावर युझर आयडी वा पासवर्ड माहित नसल्यास https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन forget password OR login id टाकुन नविन login id व password generate करावा व त्यानंतर अन्न व्यावसायीकांचा वार्षिक परतावा फॉर्म डी – १ सादर करावा . तसेच वार्षिक परतावा भरण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास व टोल फ्री नं – १८००११२१०० माहितीसाठी foscos@fssai.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा ” . अथवा helfdesk तसेच डी १ फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ३१/०५/२०२२ असुन सदर तारखेनंतर अर्ज करणाऱ्यांना प्रती दिन रु .१०० / – याप्रमाणे दंड शुल्क भरावे लागेल , याची सर्व उत्पादक आस्थपनांनी नोंद घ्यावी .