
दैनिक चालू वार्ता वडेपुरी प्रतिनिधी – मारुती कदम
एप्रिल मे महिन्यामध्ये कोरडवाहू खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीचा काळ चालु आहे शेतकरी राजा कामात व्यस्त आहेपूर्वीच्या काळामध्ये बैलाचे लाकडी अवजाराने हिवाळा मध्येच मशागती सुरू व्हायच्या ,पण हल्लीच्या काळामध्ये आधुनिक पद्धतीने बैलाची ओताची जागा आता ट्रॅक्टरने घेतलेली आहे शेतकरी हा आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरने मशागत करताना दिसतो लाकडाचे नांगर ,लाकडी वखर, लाकडी तिफण, हे सर्व काही शेतकर्याच्या शेतीतून हद्दपार झालेले दिसून येते पूर्वीच्या काळामध्ये पशुपालन हा शेतकऱ्याचा जोडधंदा होता पण आता पशु हे दुर्मिळ दिसून येत आहेत. शेतकऱ्याकडे बैला ऐवजी शेतामध्ये ट्रॅक्टर काम करताना दिसून येत आहे .हल्ली डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि शेतीमध्ये ट्रॅक्टरने मशागत करत असताना खूप खर्च येतो आहे .पूर्वीची पिढी सांगताहेत बैलाने मशागत केल्याने शेतामध्ये चांगल्या पद्धतीने मशागत होते कमी खर्चामध्ये पण हल्लीच्या युवकांचे शेतामध्ये कमी लक्ष आणि इतर व्यवसायामध्ये कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा, यामुळे शेतीही शेतकऱ्यांना परवडेल अशी झालेली नाही.शेतामध्ये शेतमजूरही काम करायला तयार नाही तसे पाहिल्यास शेतीसाठी वेगवेगळ्या योजना आहेत शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात ,दुष्काळी अनुदान मिळते, पण हे सर्व करूनही शेतीमधला वाढता खर्च आधुनिक पद्धतीचे यंत्रसामुग्री खते बी-बियाणे यांचे वाढलेले भाव ,यामुळे शेतकरी सध्याच्या काळामध्ये सर्व काही मिळूनही समाधानी नाही. कारण पूर्वीच्या काळामध्ये बैलाने नांगरणी वखरणी व्हायची कमी खर्चामध्ये सर्वकाही व्हायचे पण आता ट्रॅक्टर नांगरणी ,ट्रॅक्टर पेरणी, सर्वकाही यंत्र सामुग्री ने कार्य चालू आहे आणि त्यामुळे शेतीचा खर्च वाढलेला आहे सरासरी 10 ते 15 हजार रुपये खर्च आणि उत्पन्न पंधरा ते सोळा हजार यामुळे शेतकरी चिंतेत आहे शेती नाही कराव अवघड आणि शेती कसावी तरीही अवघड यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पशुपालन याकडे लक्ष दिले पाहिजे पशुपालन यामुळे दुग्ध व्यवसाय चालतो .आपल्या शेतीमध्ये मिळतो पोषकद्रव्यं मिळतात आणि शेती कामासाठी लागणारे पशुधन बैल हेसुद्धा या पशुपालनातूनच तयार होतात .त्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा एकदा पारंपारिक पद्धतीकडे वळले पाहिजे पारंपरिक पद्धतीने पशुपालन याकडे लक्ष देऊन कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे निगेल त्यासाठी सर्व शेतकरी युवक त्यांनी आपल्या शेतामध्ये पूर्वीची हिवाळ्यामध्ये शेतीची मशागत करायला तयार व्हावे, त्यावेळेस मशागत सुरू करावी नंतर लाकडी व वखरानी बैलाची वखर पाळी करावी व शेतातील पूर्वी ची मशागत आहे ती जर केली तर सोन्याचे दिवस यायला वेळ लागणार नाही. दरवर्षीच यावर्षीच्या झालेले नुकसान पुढच्या सुगीत होईल या आशेने शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करतो सर्व काही त्याचे पावसावर अवलंबून आहे पावसाची उघडझाप मधेच पावसाची थांबणे या सर्वाला आपणच जबाबदार आहोत यासाठी सर्वांनी झाडे लावावी लागेल नैसर्गिक पद्धतीने शेती करावी लागेल आणि पाण्याचा अपव्यय टाळावा लागेल. तेव्हाच पूर्वीच्या काळातील शेती जशी सुजलाम-सुफलाम होती तशीच शेती सुजलाम सुफलाम होईल शेतामध्ये सालगडी ठेवायचं असेल तरीही एक लाख रुपये मोजावे लागत आहेत आणि अशा ह्या नापिकी च्या काळामध्ये सालगडी तरी कसा ठेवावा आणि शेतात भांडवल तरी कसे खताच्या,कीटकनाशकाच्या रूपाने टाकावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे .तरीही रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी हा शेती पिकवतो ,व फुलवतो आणि सर्व जगाला जगवतो म्हणूनच तर कवीवर्य यांनी म्हटलेले आहे माझा शेतकरी बाप ,उभ्या जगाचा पोशिंदा ,रात्रंदिस लिहिलेला त्याच्या भाळी कामधंदा.काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर ,शेतकरी जगला पाहिजे आणि जगायला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी ही बिनखर्चिक पद्धतीने पारंपरिक शेती करून खर्च कमी होतो उत्पन्न जास्त काढावे, आणि आधुनिक पद्धतीने शेती केली तरीही त्यामध्ये रासायनिक खताचा कमीतकमी वापर करून सेंद्रिय पद्धतीने पशुपालनाच्या मदतीने शेती करावी एवढेच या खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या निमित्ताने लोहा कंधार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मशागत करून या वर्षीच्या मान्सूनची वाट पाहत आहेत. आणि ह्या वर्षी तरी पाऊस चांगला होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगले निघावे व बळीराजा हा सुखी व्हावा.लोहा तालुक्यातील अठ्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र जमीनची मशागतीचे कार्य बळीराजा हा अतिशय उल्हासाने करताना दिसून येत आहेत…