दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : महाराष्ट्रात रा.प.महामंडळाच्या एस टी कर्मचाऱ्यांचा गेली सहा महिने प्रदीर्घ संप चालू होता. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत होते. म्हणून पीएमपीएल प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी तेरा मार्गांवर बस सेवा सुरू केली होती. त्यामुळे जिल्ह्य़ातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु आता एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे तेथे आता पुणे बससेवीची आवश्यकता नसल्याने तसेच पुणे शहरातील वहातूकीसाठी काही बसेस व कर्मचारी कमी पडत असल्याने ह्या १३ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लीलाधर मिश्रा यांनी काल तसे आदेश काढले आहेत. बंद होणारे १३ मार्ग: पुणे -निरा, भोसरी -जुन्नर, चाकण – शिक्रापूर, हडपसर -यवत, स्वारगेट -वेल्हा, भोसरी -मंचर -घोडेगाव, वाघोली – रांजणगाव, सासवड – जेजुरी, कात्रज -साखेळा, स्वारगेट – पानशेत, स्वारगेट – खारवडे, वाघोली – राहू. तरी प्रवाशांनी ह्याची नोंद घ्यावी असे प्रशासनाने कळविले आहे.
