
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: देगलूर तालुक्यातील वझरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील.16-5-20220 रोजी शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने त्याचा फायदा घेऊन अज्ञातांनी शाळेचा खूप मोठे नुकसान करून शाळेच्या परिसरात दारू पिऊन दारूच्या बाटल्या फोडून शाळेच्या परिसरात बाथरूम दरवाजे लाथा बुक्क्यांनी दगडांनी मोडून पाईपलाईनचे मोठे नुकसान केले तसेच इतर साहित्याची नासधूस केली आहे.यामध्ये शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकीकडे शाळेची गुणवत्ता व भौतिक सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न होत असताना, शाळेचा स्तर उंचावण्यासाठी शाळेतील शिक्षकांकडून होणाऱ्या प्रामाणिक प्रयत्नांना हरताळ फासण्याचे काम काही समाजकंटक करत आहे तरी त्यांचा शोध घेऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे.