
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
राज्यामध्ये महा विकास आघाडीचे सरकार असून यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रित सरकार मध्ये आहे. तसेच तालुका पातळीवर व गाव पातळीवर हे तिने पक्षांना एकत्रित काम करण्यासाठी “कॉमन मिनिमम प्रोग्राम” ठरलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकी पासून काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी ला वरून पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहिलेला आहे. पण महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांमध्ये काँग्रेसला साधा निमंत्रण ही नसता.पण वाद नको म्हणून काँग्रेसने नेहमी संयमाची भूमिका घेत राष्ट्रवादीला कायम सहकार्य करत आले आहे .
इंदापुर मध्ये होत असलेल्या विकास कामांसाठी विविध खात्यांचा निधी इंदापूर तालुक्यामध्ये येत आहे. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा सर्वाधिक निधी आलेला आहे. ह्या कामाच्या शुभारंभासाठी जे फलक लावलेले असतात त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा कधीही फोटो नसतो ही गोष्ट निषेधआर्य आहे. तसेच महा विकास आघाडी सरकारचा विविध खात्यांत महाराष्ट्र शासनाचा निधी इंदापूर तालुक्यामध्ये येतो त्यामध्ये केवळ राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो असतात, याची खंत काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला वाटते. सातत्याने राष्ट्रवादीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांकडे निरोप देऊनही ही चूक सुधारत नसतील तर याची लेखी तक्रारही प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच विधीमंडळाचे काँग्रेसचे नेते नामदार बाळासाहेब थोरात व पुणे जिल्हा काँग्रेसचे संपर्कप्रमुख नामदार सुनील जी केदार यांच्याकडे करणार असल्याचे इंदापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चमन बागवान यांनी पत्रकारांना सांगितले.