
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे: त्यांनी प्रेमविवाह केला. पण, वैचारिक मतभेदांमुळे दोन वर्षांपासून ते अलिप्त राहिले. त्यामुळे या दाम्पत्याचा घटस्फोट अवघ्या ९ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी मंजूर केला आहे. दोघांनी अॅड आकाश सुधीर चव्हाण आणि अॅड खय्युम नय्युम सय्यद यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने अर्ज केला होता. गौतम आणि गौतमी (नावे बदलली) अशी त्या जोडप्याची नावे आहेत. मे २०१९ मध्ये त्यांचा प्रेमविवाह झाला होता. जानेवारी २०२० पासून ते वेगळे राहत होते. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार सहा महिन्यांचा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदारांच्या वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा अद्भुत निकाल दिला.
प्रेमविवाह योग्य की अयोग्य हे सांगणे कठीण आहे. नात्यात समजूतदारपणा हवा. या प्रकरणात परिस्थिती पाहता दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याने वेळ, पैशांची बचत आणि मानसिक त्रासातून सुटका झाली आहे, अशी संबंधित वकिलांनी प्रतिक्रिया दिली.