
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
सराटी तालुका इंदापूर येथील अँड राहुल जगदाळे , पै रोहित जगदाळे यांच्या सहकार्यातून RJ ग्रुप यांच्या मार्गदर्शनाखालीधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संयुक्त विद्यमाने भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान यशस्वीरित्या पार पडले या कुस्ती मैदानामध्ये शंभर रुपयापासून 51 हजार रुपये पर्यंतच्या निकाली कुस्त्या लावण्यात आल्या. मानाची कुस्ती पैलवान महारुद्र काळेल कुर्डूवाडी विरुद्ध दत्ता नरळे गंगावेश तालीम कोल्हापूर अतिशय चुरशीची कुस्ती झाली व बरोबरीत सोडवण्यात आली या कुस्ती मैदान साठी प्रमुख उपस्थिती राज्याचे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, धैर्यशील मोहिते पाटील, तालुका अध्यक्ष हानुमंत कोकाटे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, बाळासाहेब कोकाटे, शिवधर्म फाउंडेशन अध्यक्ष दीपक काटे, लालासाहेब काटे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले व अनेक मान्यवर उपस्थित होते. या कुस्ती मैदानसाठी उपस्थित असलेले वस्ताद मल्ल सम्राट पैलवान रावसाहेब मगर, वस्ताद विश्वास हारगुले, कुस्ती सम्राट पैलवान आसलम काजी, महादेव ठवरे, तानाजी ठवरे, आण्णासाहेब गायकवाड हे वस्ताद उपस्थित होते या मैदानचे खास आकर्षण अशी इंटरनॅशनल पैलवान नामदेव कोकाटे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन रामा कांबळे या कुस्तीमध्ये नामदेव कोकाटे विजय झाला. पैलवान काकासाहेब जगदाळे यांचा चिरंजीव प्रणव जगदाळे सलामीच्या कुस्तीमध्ये विजय झाला. शिवरत्न कुस्ती अकॅडमीच्या राजवीर मोरे यांनी अनेकांची मने जिंकली तसेच राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या ताराराणी महिला कुस्ती संकुलन यांच्या महिला कुस्तीगीर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ आदर्श वस्ताद पुरस्कार मिळालेले गंगावेस तालमीचा वस्ताद विश्वास दादा हारगुले यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कुस्ती मैदानसाठी ऐकएक काळचे मार्गदर्शक सुप्रसिद्ध पैलवान काकासाहेब जगदाळे व अँड.पै. राहुल जगदाळे, RJ ग्रुप चे सर्व कार्यकर्ते रोहित जगदाळे मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले व संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी सराटी या ठिकाणी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान घेण्याचे RJ ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मैदान घेणार आहे असे जाहीर केले. मल्लसम्राट रावसाहेब मगर यांचा मानाचा फेटा पै. रोहित जगदाळे यांना बांधून पाठीवर शाबासकीची थाप टाकली. या कुस्ती मैदानाचे सूत्रसंचालन पैलवान युवराज तात्या केचे गारअकोले यांनी केले.