
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामणोली तर्फे कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार वय २२ यांना कर्तव्यांवर असताना वीरमरण आले. प्रथमेश पवार हे जम्मू येथे सीमा ब्लॅक येथील झालेल्या चकमकीत रात्री १०.३० सुमारांस त्यांना वीरमरण आले. प्रथमेश यांचे पार्थिव उद्या रविवारी बामनोली तर्फे कुडाळ गावी आणण्यांत येणार असल्यांची माहिती लष्करी विभागाकडूंन मिळाली. प्रथमेश पवार हे तीन महिन्यापूर्वीच भारतीय सैन्यामध्ये भरती झाले होते. आपण सीमा सुरक्षा दलात नोकरी मिळवण्याची आणि देशसेवा करायची असे त्याचे स्वप्न लहानपणापासूनच होते वयाच्या 22 वर्षी प्रथमेश त्यांनी जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांना प्रतिउत्तर देत कर्तव्यांवर असताना त्यांना वीरमरण आले. प्रथमेश पवार यांचे माध्यमिक शिक्षण बामणोली तर उच्च माध्यमिक शिक्षण पाचवड या ठिकाणी पूर्ण झाले. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असा होता त्यांच्या पश्चांत आई वडील भाऊ बहीण असा त्यांचा परिवार होता. प्रथमेश पवार यांच्या कुटुंबातील एका सदस्यांने दिलेल्या माहितीवरुन दिनांक १९ मे रोजी रात्री जवान प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात ड्युटीला होते त्यावेळी अचानक झालेल्या दहशतवाद्यांसोबत प्रतिउत्तर देत असताना त्यांच्या पायाला गोळी लागली यांत ते गंभीर जखमी झाले रुग्णालयांत उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली. रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी येणार असून सातारा जिल्हा प्रशासनांच्या वतीने व लष्करी विभागाकडूंन अखेरची मानवंदना देऊन प्रथमेश पवार यांना नयना अश्रूंनी भावुक असा निरोप देण्यांत येईल.