
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
७ जून पूर्वी अनुदान वाटप नाही केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
—————————————
लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानतील शिल्लक 25% रक्कम वाटप करण्यास नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही टाळाटाळ करीत असून लोहा कंधार मतदार संघातील हरिहरराव भोसीकर हे या जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असून शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी मित्र साहेबराव पाटील काळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला असून जर मरग नक्षत्र 7 जून च्या अगोदर दुष्काळातील शिल्लक 25 टक्के अनुदान वाटप केले नाही तर लोहा तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी मित्र साहेबराव काळे यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना शेतकरी मित्र साहेबराव काळे यांनी सांगितले की गतवर्षी लोहा तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करा अशी मागणी केली असता शासनाने दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळाची अनुदान मंजूर केले व हेअनुदान जिल्हा बँकेत वाटप करण्यासाठी जमा केले व यातील पहिला हप्ता म्हणून 75 टक्के अनुदान वाटप केले व उर्वरित 25 टक्के अनुदान नंतर वाटप करण्याचे जाहीर केले.
पण नांदेड जिल्ह्यात दुष्काळी अनुदानातील पहिला हप्ता 75% हे गेल्या वर्षी अनुदान वाटप केले व यंदा 25 टक्के अनुदान वाटप करण्यात आले आहे परंतु लोहा तालुक्यात कुंपणाने शेत खाल्ले या म्हणीप्रमाणे झाले असून आद्यापर्यंत लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळातील शिल्लक 25 टक्के अनुदान अद्याप पर्यंत वाटप झाले नाही याकडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष- उपाध्यक्ष हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत .यात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष हे लोहा कंधार मतदार संघातील असून देखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे. जर शासनाचे अनुदान जिल्हा बँकेला वर्षे होऊन सुद्धा वेळवर वाटप करता येत नसेल तर शासनाने शेतकऱ्यांमुळे शासकीय अनुदान हे राष्ट्रीयकृत बँकेमार्फत वाटप करावे वर्षभर शेतकऱ्याचा पैसा वापर करणाऱ्या जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना व्याजासहित अनुदान वाटप करावे पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होऊन शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसा लागतो जर जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी तात्काळ लक्ष देऊन 7 जून पर्यंत लोहा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप करावे लोहा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी वेळेवर काम करीत नाहीत कर्मचारी कमी आहे म्हणून सांगतात तेव्हा येथे कर्मचारी वाढवावे किंवा येथील सर्व कर्मचारी स्टाॅप यांची अन्यत्र बदली करुन चांगले कर्तव्यदक्ष कर्मचारी यांची नेमणूक करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी मित्र साहेबराव काळे यांनी दिला आहे