दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- जिल्हाचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यांचे वर्षातून नियोजित वेळेत बैठका होवून. जिल्हातील सर्व विभागांना सम समान निधी उपलब्ध व्हावा जनतेचे शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकार्यांच्या विरोधात अनेक तक्रारी अडचणी असतात. ते जिल्ह्यतील सर्व नागरिक पालकमंत्र्यांसमोर समस्या मांडून संबंधित सरकारी अधिकार्यांकडे मांडू शकतात. समस्यांचे निराकरण वेळी होते. पालकमंत्री वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थित असल्याने जिल्हातील सर्व आमदार, खासदार देखील वेगवेगळ्या बैठकांना हजर राहून आपल्या मतदारसंघातील समस्या मांडू शकतात. सदरील कार्यालयाचा खर्च शासकीय तिजोरीतून होतो, जसे कार्यालयातील कर्मचारी, संगणक प्रिंटर, फर्निचर ईत्यादी चा खर्च सार्वजनिक आहे. म्हणून वैयक्तिक बंगल्यामध्ये पालकमंत्र्यांचे कार्यालय नसावे. जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद कार्यालयात असणे नागरिकांच्या सोईसाठी आवश्यक आहे. एवढेच काय पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर नागरिकांनी निवेदन अर्ज दिल्यास त्याचे पोच स्टॅप मारुन मिळत नाही. तेथील सुरक्षा कर्मचारी निवेदणे स्विकारतात हे योग्य नाही. पालकमंत्री हे नाव लोकशाही प्रजासत्ताक सरकार मधील आहे. हुकूमशहा आपल्या राजवाड्यातून कारभार पुर्वी चालवत होते. ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेने बंद केले आहे. म्हणून पालकमंत्री सध्या व पुर्वी ४० वर्षापासून खूप वजनदार नेते आहेत. तात्काळ पालकमंत्री कार्यालय स्वताच्या बंगल्यातून जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये हलवावे अशी मागणी श्री. एस. एस. खैरवाड यांनी अपर जिल्हादंडाधिकारी श्री. प्रदिप कुलकर्णी यांना निवेदन देऊन कळविले आहे.
