
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थी तब्बल 22 वर्षांनी एकत्रित येणार आहेत. या भेटीच्या दिवशी या माजी विद्यार्थी आपल्या जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत.
खर तर इतक्या वर्षांनी एकत्रित भेटणार म्हटल्यावर सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे की कधी आपण सर्व एकदाचे भेटतो आहे. शालेय जीवनातील आपले मित्र इतक्या वर्षांनी भेटणार आहे,म्हटल्यावर प्रत्येक जण काय करत असेल कसा दिसत असेल याचाच विचार प्रत्येकाच्या मनात सुरू आहे. हा स्नेहमेळावा रविवार दि. 29 मे रोजी इंदापुर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये होणार आहे.
व्हॉट्सअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियामुळे अनेकांचा संपर्क एकमेकांशी येत होता. मात्र ऑनलाइन असलेली ही मैत्री काही बहरून येत नव्हती. त्यासाठी सर्वांनीच निश्चय केला आणि गेट टुगेदर करण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरला. या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात केवळ विद्यार्थी मित्र-मैत्रिणीच नव्हे,तर शिक्षकही सहभागी होणार आहेत. यामुळे या मेळाव्याची रंगत आणखीनच वाढणार आहे.
या मेळाव्यासाठी 2000 सालाची इयत्ता 10 वी ची बॅच परिश्रम घेत आहे.