
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
गारअकुले येथील बजरंग आखाड्याची ओळख प्रसिद्ध आसल्यामुळे संपूर्ण राज्यांन मधून पैलवान उपस्थित होते.
गारअकुले तालुका माढा येथील स्वामी महाराजांच्या पावन भूमीमध्ये माजी सरपंच जितेंद्र गायकवाड,पै.आण्णा गायकवाड, यांच्या माध्यमातून गारअकुले येथील बजरंग आखाड्या मध्ये निकाली कुस्त्याचे जंगी मैदान भरविण्यात आले .कोरोना महामारी संकटानंतर पहिल्यांदाच कुस्ती मैदान भरवीले आसताना. कुस्ती शौकिन पैहीलवान यांनी हाजेरी लावल्यामुळे. 200 हुन अधिक कुस्त्या आखाड्यामध्ये निकाली लावण्यात आल्या.
पै.आण्णा गायकवाड मित्र परिवार गारअकुले यांच्यावतीन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य आणि दिव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले . यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान संतोष दोरवड गंगावेस तालीम// विरुद्ध// गणेश जगताप कुस्ती संकुलन केंद्र पुणे संपलेल्या कुस्तीमध्ये पै. संतोष दोरवड विजय होऊन पैलवान गणेश जगताप याला हार मानावी लागली. विजय झालेला पैलवान संतोष दोरवड याची आखाड्यामध्ये मिरवणूक काढण्यात आली.
संयोजक:- पै.आण्णासाहेब गायकवाड यांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले.गारअकुले येथील बजरंग आखाड्यामध्ये नामांकित कुस्ती शौकीन पहिलवान यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या आखाड्या मध्ये पंच म्हणून गोरक केचे, आमर जगदाळे, हरिदास वाळेकर, मच्छिंद्र खटके, अशा आनेक कुस्ती मल्लांनी . पंच म्हणून काम पाहिले.
कुस्ती सम्राट रावसाहेब मगर यांनी आण्णा गायकवाड यांना मानाचा फेटा बांधून सन्मान केला.
तर मल्लसम्राट रावसाहेब मगर सभापती संग्रामसिंह शिंदे, इंदापूर पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, युवा नेते आमर जगदाळे हे सर्वजण कुस्ती मैदानासाठी आले आसता यांना मानाचा फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.