दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोळाचा ओढा परिसरांतून दुचाकी चोरी केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यांतील गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांला रांगेत पकडले. त्याच्याकडून चोरीचे दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले शुभम दीपक कडव (रा.मोळाचा ओढा सातारा)असे आरोपीचे नाव असून शुभम कडव यांच्याकडे चोरीच्या दुचाकी बाबत विचारपूस केली असता त्याने दुचाकी चोरल्यांची कबुली पोलिसांना दिली यापूर्वीही त्याच्यांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यांत तीन चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत अशा प्रकारे शाहूपुरी पोलीस गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरील आरोपी गोपनीय माहिती वरुन जेरबंद करुन त्याच्याकडूंन चोरीची दुचाकीची १०.००० रुपये किमतीची मोटरसायकल हस्तगत करुन मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा.अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक मा.आजित बोहाडे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखांली सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत यादव, पो.हसन तडवी ,शैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार ,सचिन पवार स्वप्नील सावंत आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला त्यांच्या या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षकांकडुंन कौतुक व अभिनंदन करण्यांत आले
