
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: ‘गुलटेकडी मार्केट यार्डात होणारीसन्मानित आवक तसेच वाढणारी गर्दी, यासाठी बाजार पुरेसा नसेल तर उद्याचा विचार करण्याची गरज आहे. वाढत्या शहराच्या पार्श्वभूमीवर मार्केट स्थलांतरित करण्याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठियांच्या संकल्पनेतून लिहिलेल्या ‘व्यापाराचे विद्यापीठ’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते रविवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते. वानवडी येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी उद्योजक संजय घोडावत, बँकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर उपस्थित होते.
गुलटेकडी मार्केट यार्डला विद्यापीठात रूपांतरित करण्यात मोलाचा वाटा असलेल्या संबंधित विविध क्षेत्रांतील ३१ मान्यवरांना ‘मास्टर ऑफ बिझनेस’ने सन्मानचिन्हासह सन्मानित करण्यात आले.
पवार म्हणाले, ‘शहरातील मध्यवस्तीत असलेल्या नाना-भवानी पेठ येथून बाबा पोखर्णा यांच्या नेतृत्वाखाली गुलटेकडी येथे ४० वर्षांपूर्वी हलविण्यात आले होते, असे ते म्हणाले