
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात नांदेड दक्षिण चे कार्यसम्राट आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत सलग दुसऱ्या वर्षी ही रुग्णांना केळी,चिकू, बिस्कीट पुडे, आदी फळे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमांचे आयोजक युवक काँग्रेसचे दत्ता पाटील दिघे, नां.द.महासचिव सुदर्शन शेबाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जाधव, डॉ. चव्हाण, माजी नगरसेवक शरफोदीन शेख, भूषण दमकोडवार , शाम नळगे, पत्रकार विलास सावळे, छायाचित्रकार विनोद महाबळे, रामेश्वर पाटील मोरे, गणेश पा.किरवले , छावाचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील दिघे, मंगेश जाधव, अनवर पठाण, श्रीकांत पाटील पवार ,वेदांत सावकार, सतार शेख, रोहनाज शेख, आदी उपस्थित होते.