
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यास दि.२०/०५/२०२२ रोजी मौजे धसवाडी ता.अहमदपूर जि. लातूर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री महादेव कुंभार आले होते. ग्रामपंचायत कार्यालयात सदर योजनेच्या संदर्भात घेण्यात आलेले अभिलेख दाखवण्याकरिता विचारांनी केली असता ऑगस्ट २०१६ ते २०१७ या वर्षातील एकही अभिलेख ग्रामपंयतीकडे नसल्याचे आढळून आले. या बाबत सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक श्री चातरे वैजनाथ आणि Data एन्ट्री ऑपरेटर, श्री धोंडिबा केळे यांच्याकडून याचा लेखी जवाब घेतला असून याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.लातूर तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती अहमदपूर यांना उचित कार्यवाही करिता सादत करण्यात आला आहे . या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की , ग्रामपंचायत धसवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र (अ) मध्ये धनधांडग्या लोकांची नावे दिसून आल्यानंतर गरीब व गरजुंना डावलण्यात आल्याचे लक्षात आले त्यानंतर गावातील तरुणांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर यात गैरव्यवहार व अफरातफर झाल्याचे उघडीस आले .याच प्रकरणी चौकशी करण्याकरिता सहाय्यक गटविकास अधिकारी मौजे धसवाडी येथे दि. २०/०५/२०२२ रोजी आले असता सदर प्रकार उघड झाला.
प्रकरणाची चौकशीत विलंब झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांमध्ये रोष निर्मान होत आहे .तरी तात्काळ चौकशी पूर्ण करून योजना राबविण्यात यावी असे धसवाडी येथील ग्रामस्थ यांनी सांगितले आहे