
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कलंबर (खुर्द) :– लोहा तालुक्यातील कलंबर (खुर्द) येथे ग्रामसभा घेऊन पुढील प्रमाणे गावाचा विकास करण्यासाठी कामाच्या मागण्या मा. ना. श्री. आ. अशोकराव चव्हाण साहेब पालकमंत्री व बांधकाम मंत्री यांच्याकडे ग्रामसभेत करण्यात आल्या. १) गेबी महाराज मठ संस्थान कलंबर खुर्द सांस्कृतिक सभागृह . २) कलंबर खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय ईमारत खिळखिळी झाली आहे. १९८० चे बांधकाम केलेले आहे. नवीन ईमारत बांधकामासाठी निधी मंजूर करावा. ३) स्मशानभूमीसाठी निधी व जागा उपलब्ध करून देऊन बांधकामासाठी निधी मंजूर करावा. माळाचे पाणी नदीला जाणारा नाला गावातून जातो त्यामुळे पावसाळ्यात पाणी वस्तीत शिरुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी तो नाला ४०० मीटर रुंद करून सिमेंटचे बांधण्यासाठी मंजुरी व निधी करावा. ५) रस्त्याचे सांडपाणी नदीला सोडण्यासाठी ५०० मीटर सिमेंट नालीबांकाम निधी मंजूर करावा. ६) संत निवृत्ती महाराज व संत महाराज मंदिराच्या ८०० मीटर रस्त्यासाठी निधी मंजूर करावा. ७) एम. एस. ई. बी. ची मोठी लाईन गावातून बारुळकडे पुर्वी गेली आहे. ती आता गावाच्या बाहेरुन काढणे. ती आता झोपडपट्टीच्या वस्तीत आहे. या मुद्दावर ग्रामसभेत चर्चा करून मागण्या करण्यात आल्या. ग्रामसभेच्याअध्यक्ष स्थानी सरपंच सौ. लताबाई गणेशराव पाटील घोरबांड या होत्या. ग्रामसभेला ग्रामसेवक श्री. आऊलवार साहेब, श्री. गणेशराव पाटील घोरबांड तसेच ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.