
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा जावली तालुक्यांतील बामणोली तार्फ कुडाळ गावचे शहीद जवान प्रथमेश संजय पवार वय २२ यांचे दिनांक 19 मे रोजी रात्री दहाच्या सुमारांस अतिरेक्यांशी प्रत्युत्तर देत असताना त्यांच्या पायाला गोळी लागली होती यांत ते गंभीर जखमी झाले उपचारादरम्यांन त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सातारासह व जावळी तालुका परिसरांत शोककळा पसरली. त्यांचे पार्थिवांवर सोमवारी सकाळी त्यांच्या मूळगावी बामणोली तर्फे कुडाळ गावांत दाखल झाले. पार्थिव पाहताच आई आणि भावांने एकच आक्रोश केला यावेळी आईने माझ्या काळजाचा तुकडा नेला असे म्हणत प्रथमेश पवार हे अवघे तीन महिन्यांपूर्वीच देश सेवेमध्ये भरती झाले होते. त्यांच्या आईला अश्रूं अनावर झाले.शासकीय इतमामांत अखेरची मानवंदना देत जावलीकडूंन त्यांना भावुक असा निरोप देण्यांत आला. यावेळी बामणीली तर्फे कुडाळ गावातून प्रथमेश पवार यांची सजवलेल्या ट्रॉलीतुन मिरवणूक काढून तसेच घरासमोर प्रत्येकांच्या रांगोळ्यांचा सडा तरुण मित्र परिवार व उपस्थितांनी भारत माता की जय, अमर रहे अमर रहे प्रथमेश पवार अमर रहे अशा घोषणा दिल्या. प्रथमेश पवार यांचे अंत्यदर्शन घेण्यांसाठी सातारा जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकारी व सैनिक सातारा तसेच जिल्हा प्रशासनांतील विविध प्रशासकीय अधिकारी व विविध मान्यवरांनी मंडळी यांनी प्रथमेश पवार यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या आईला व भावाला धीर दिला. शहीद जवान प्रथमेश पवार यांच्या पश्चांत आई-वडील भाऊ असा त्यांचा परिवार होता प्रथमेश पवार यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि साधा होता त्यांचे माध्यमिक शिक्षण हे गावातच झाले व उच्च माध्यमिक शिक्षण पाचवड या ठिकाणी झाले अत्यंत हलाखीचे व गरीब परिस्थिंतीतून ते देशसेवेत भरती झाले त्यांच्या आई वडील मोलमजुरी करुन प्रथमेश पवार यांना उच्च माध्यमिक शिक्षण देत प्रथमेश पवार हे देश सेवेमध्ये भरती झाले प्रथमेश पवार यांच्या जाण्यांने संपूर्ण सातारांसह जावलीकरांचे मन हेलावून टाकले.