
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवी सरकार इंगळी
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ .३० वाजता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आॅनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक रशीद तहसीलदार हे होते. कार्यक्रमाची सुरुवात शेख जाफरसाहाब चिखलीकर यांच्या स्वरचित स्वागतगीताने झाली . कार्यक्रमाचे आभासी उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत प्रा. डॉ. मारोती कसाब, अहमदपूर यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द कवी
अरूण घोडेराव, सिन्नर यांची उपस्थिती होती. उद्घाटकीय मार्गदर्शन करताना प्रा. मारोती कसाब यांनी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कवींना महाराष्ट्राच्या सर्व भागातून एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे काम केले. अशीच कवी व साहित्यिकांनी माणसाची एकजूट निर्माण करणे आवश्यक आहे. आज स्वातंत्र्य कुणाचं आहे ? असा सवाल उपस्थित करून स्वातंत्र्याबद्दल चिंतन होणे आवश्यक असल्याचे मत कवितेतून व्यक्त करताना म्हणतात, जपावे स्वातंत्र्य, राखावे स्वातंत्र्य, मानावे स्वातंत्र्य, मानवाचे. प्रास्ताविक संस्थेच्या सहसचिव अनिसा सिकंदर शेख यांनी केले. त्यांनी निर्माण केलेला व्हिडिओ ज्यामध्ये संस्थेने आयोजित केलेल्या सर्व कार्याची दखल घेण्यात आली. हा व्हिडिओ यावेळी प्रदर्शित करण्यात आला. कवीसंमेलनात मुरहारी क-हाड , संजय विष्णु जाधव, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड , डॉ. व्यंकट सूर्यवंशी ,महादेव दिनकर इरकर,तहेसीन मसुदअली सय्यद, सुजाता नवनाथ पुरी.अशोक बापू पवार, टी. एस. क्षीरसागर ,छाया बेले , सौ. अहिल्या गजाननराव पतंगे,श्री लक्ष्मण शिंदे, सौ۔सुचिता कुनघटकर,संभाजी भणगेऋ,डाॅ दिलीप लोखंडे, बाबूराव पाईकराव ,लातूरवरून उध्दव दुवे या निमंत्रित कवींनी सहभाग नोंदवून कवीसंमेलनाची शान वाढवली. अध्यक्षीय समारोप प्रसंगी कवीवर्य रशीद तहसीलदार यांनी संस्थेविषयी गौरवोद्गार काढले त्यांनी म्हटले की, मराठी साहित्याच्या प्रांतात मराठी भाषेची सेवा अत्यंत तळमळीने करणारी व राष्ट्रीय एकात्मता रूजण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारी ही अग्रणीय महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे . यावेळी त्यांनी चिंतनशील कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. कार्यक्रमाचे व कवीसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवयित्री निलोफर फणिबंद व गौसपाशा शेख यांनी केले. तर आभार संस्थेचे संस्थापक कवी शफी बोल्डेकर यांनी मानले.