
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी -विश्वास खांडेकर
रत्नागिरी जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे . जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे ,निसर्गाने आपल्या संपूर्ण क्षमतेने आपली कृपा या जिल्ह्यावर उधळून टाकली आहे. नैसर्गिक सौंदर्य ,झाडे-वेली वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती प्राणी समुद्रकिनारा जणूकाही स्वर्गाला ही लाजवेल अशी सुंदरता रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेली आहे. परंतु या जिल्ह्यातील काही लोकांच्या कारभारामुळे जिल्ह्याला लाभलेली नैसर्गिक सुंदरता आता रसातळाला जाते की काय असे वाटत आहे. आताच्या काळात निघालेला “पुष्पा” नावाचा चित्रपट पाहिला असेल या चित्रपटात लाल चंदनाची तस्करी होते त्याच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लाकडाची तस्करी होताना आपल्याला पाहायला मिळेल. लाल चंदन देखील या जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात सापडते पण या जिल्ह्यातील लाल चंदन म्हणजे” खैर”. जिल्ह्यात जागोजागी खैराची झाडे पहावयास मिळतात, परंतु या खैराच्या मधला चंदनासारखा लाल असणारा तो सड याला अधीक्षक किंमत आहे. ही झाडे मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हात आढळून येतात, याचाच फायदा घेऊन काही लोक या खैराच्या तस्करीचा धंदा मांडला आहे.जिल्ह्यातील अनेक लोकानी खैराचा सड विकण्याचे फार मोठ्या प्रमाणात रॅकेट उभारले आहे .
येथील लोक सरकारची कुठलीही परमिशन न घेता किंवा सरकारच्या कानोकान खबर न देता खैराची झाडे काढून व त्याचा सड मार्केटमध्ये विकत आहेत. ज्यामुळे नैसर्गिक समतोल बीघडताना जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट तेदेखील याकडे मुद्दाम दुर्लक्ष होत आहे की काय असे वाटते. संपूर्ण जिल्हाभरातून अनेक लोक खैर विक्रीचा धंद्या मध्ये संलग्न झालेले आहेत. खैर अठराशे ते अडीच हजार रुपये मन या भावाने शेतकऱ्या कडून घेतला जातो आणि त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.
कधी कधी हा खैर शेतातून चोरून देखील आणला जातो, कारण येथील अनेक लोक मुंबई व इतर शहराच्या ठिकाणी कामासाठी आहेत. अशावेळी ते लोक नसताना त्यांच्या शेतातील खैर परस्पर चोरून तो बाजारात विकला जातो. या ठिकाणची पोलीस देखील अतिशय सुस्त अवस्थेत आहेत, समोरून गाड्या जात असताना देखील त्या सोडल्या जातात. आम्हाला तर असे वाटते की प्रशासनासोबत येथील काही राजकीय लोक देखील यात गुंतले आहेत की काय? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात उघड-उघड खैर सागवान लाकडाची तस्करी चालू असताना प्रशासन राजकीय नेते यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्यच नाही .सामान्यातील सामान्य व्यक्ती देखील खैर सहजपणे विकु शकतो. एका झाडाचे किंमत दहा हजारापेक्षा जास्त आहे . त्यामुळे प्रशासन जर याकडे लक्ष घालत नसेल तर पुढे व्यक्तींच्या नावासहित आणि गावासहीत बातम्या प्रसारित केल्या जातील. ह्या बातमीनंतर प्रशासनाला जाग येत नसेल तर निसर्गप्रेमींच्या मार्फत ही जनजागृती लोकांमध्ये केली जाईल. एवढे मात्र या तस्करांनी लक्षात ठेवावे. हा भाग एक असून पुढील भागात याचे मोठ्याप्रमाणात विश्लेषण करण्यात येईल, ही सर्व निसर्ग वाचण्याची मोहीम आहे हे प्रशासनाच्या ध्यानात आनुन देण्याचा प्रयत्न आहे.