
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
तालुक्यातील खडकमांजरी येथील काँगेस पक्षाच्या वतीने व पक्षाचे तालुका सहसचिव नागनाथ चींतलवाड यांच्या पुढाकारातून नांदेड दक्षिण मतदार संघाचे आ. मोहन (अण्णा) हंबर्डे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
नांदेड दक्षिण मतदार संघाचे आ. मोहन (अण्णा) हंबर्डे यांच्या दि. २३ रोजी सोमवारी वाढदिवसानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने व पक्षाचे तालुका सहसचिव नागनाथ चींतालवाड यांच्या पुढाकारातून खडकमांजरी ता. लोहा येथे मिठाई वाटून तसेच आ. हंबर्डे यांना उदंड निरोगी दीर्घायू लाभून त्यांचा पुढील राजकीय प्रवास मंगलमय होवो अशी कामना करण्यासाठी गावातील महादेव मंदिरात अभिषेक पूजा करण्यात आली. तसेच गावात मिठाई वाटप करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तालुका सहसचिव नागनाथ चींतलवाड, खडकमांजरीचे सरपंच प्रतिनिधी माधव पाटील कापसे, माजी सरपंच श्याम वाघमारे, शिवदास चौगुले, आनंदराव एडके, उपसरपंच प्रतिनिधी संतोष वाघमारे आदींनी आ. हंबर्डे यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी बहुसंख्य खडकमांजरी ग्रामस्थांची उपस्थिती होती.