
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: देगलूर शहरातील शिवाजी पार्क ते बिलाल मस्जीदकडे जाणाऱ्या रोड व नालीचे बोगस काम. दाखवून लाखो रुपये उकळले देगलूर नगर परिषद देगलूर यांनी सन 2017 मध्ये शिवाजी पार्क ते बिलाल मस्जीदकडे जाणाऱ्या रोड व नालीचे कामाअंतर्गत रोडचे काम न करताच रु. 2,13,706/- व नालीचे काम थातूर मातूर करुन 7.18,132/- असे एकूण रु.9,31,898/- चा अपहार केले बाबत दोषीवर कार्यवाही होणे अपेक्षीत आहे. देगलूर नगर परिषद देगलूर अंतर्गत शिवाजी पार्क ते बिलाल मस्जिदकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण (WBM) कामाकरीता रु. 2,13,706 अक्षरी दोन लाख तेरा हजार सातशे सहा सप्टे बुक क्र. 13 पान 05 दि.31.07.2017 प्रमाणे काम न करताच उचल केले असून सध्या स्थितीत या रोडवर काटेरी कुंपण व नालीचे घाण पाणी साचून रस्ता बंद झाला आहे.
सदरील रस्ता शासकिय दवाखाना नगर पालिका, धुंडा महाराज विद्यालय सब रजिस्ट्री ऑफीस, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळबाकडे मस्जिदकडे जाणारा मार्ग आज परिस्थित या नगर पालिकेने या रस्त्याचे काम बोगस दाखवून हा रस्ता बंद करुन अतिक्रमण कर्त्या लोकांना
वापरणेस दिल्यामुळे रस्ता बंद करण्यात येत आहे. तसेच सदरील रोडच्या लगत वडर समाजाचे घराच्या बाजूने रोड लगत R.C.C. DRAN नाली चे काम बोगस दाखवून रुपये 7,18,132/- बुक नं. 13. पान नं. 10. दि. 19.01.1917 रोजी काम
ऐसे उचल केले आहे.
सदरील रोड व नालीचे काम न करताच बोगस दाखवून चुक नं. 13 पान नं.05 प्रमाणे दि.31.07.2017 प्रमाणे रोडचे रुपये 2,13,766/- व नालीचे बुक नं. 13, पान नं 10, रुपये 7.18,132/ दि.04.10.2017 प्रमाणे असे एकूण रुपये 9.31,898/- खर्च झाल्याचे दाखवून नगर परिषद देगलूर जि.नांदेड येथील नगराध्यक्ष, मुख्याधिकारी अभियंता यांनी संगनमत करून पैशाचा भ्रष्टाचार केला आहे. व शहरातील ड्रेनेजचे गुत्तेदार शारदा कंन्स्ट्रक्शन नांदेड व नगर परिषदेने संगनमत करुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर या विषयांमध्ये लक्ष घालून शहरातील जनतेचे जीवन व आरोग्य अबाधीत राहण्याकरीता शासनाकडून आलेल्या निधीचा गैरवापर व भ्रष्टाचार करून विल्हेवाट लावणाऱ्या व गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी छळून रोडची चोरी करणाऱ्या नालीतील खाणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी कार्याची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती चौकशी करून असे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदाराची परवाने रद्द करून यांना दंड आकारण्यात यावा अशी या परिसरातील नागरिकांनी विनंती आहे