
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा भव्य सत्कार
मराठवाड्यात अग्रेसर म्हणून ओळखले जाणाऱ्या लोहा नगर परिषदेच्या प्रगणांत समतेचे पुरस्कर्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मंजुर करण्याचा ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत दिली.
लोहा न.पा.च्या प्रगणांत समतेचे पुरस्कर्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांनी लोहा येथे दि. ११ /5/2022 रोजी व्यंकटेश गार्डन येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९१ व्या जयंतीनिमित्त बोलताना केली होती. तेव्हा नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी प्रा. मनोहर धोंडे सर यांना आश्वासन दिले होते की लोहा न.पा. च्या प्रगणांत महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी दि. २० मे २०२२ रोजी लोहा न.पा.च्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडून मंजूर करुन लोहा न.पा.च्या प्रगणांत महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा बसविण्यात येणार असे म्हणाले होते.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते , माजी आमदार ईश्वरराव भोसीकर ,लोहा न.पा. चे माजी नगराध्यक्ष कल्याणराव सुर्यवंशी , किशोर स्वामी यांच्यासह ५०० जणांनी.लोहा न.पा. ने शहरात महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा बसविण्याची मागणी केली होती.
तसेच लोहा शहरातील सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने ही लोहा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवावा म्हणून अशी मागणी होती.
तेव्हा यांची दखल लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी घेऊन दिनांक २० /5/ २०२२ रोजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली लोहा न.पा.ची सर्व साधारण सभा लोहा न.पा.च्या सभागृहात पार पडली यावेळी लोहा न.पा. कार्यालयाच्या आवारात महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा असा ठराव नगरसेवक करीम शेख यांनी मांडला व त्यांना अनुमोदन नगरसेविका राहिबाई खिल्लारे यांनी दिले व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला यावेळी सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
लोहा शहरात सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात लोहा शहर हे मराठवाड्यात अग्रेसर असणारे शहर असुन लोहा शहरांच्या विकासासाठी आम्ही कुठे ही कमी पडणार नाही.
याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे काम लोहा न.पा.च्या वतीने चालू आहे. मुस्लिम समाज बांधवांच्या बडेसाब दर्गा चे सुशोभीकरणाचे काम ही लोहा न.पा. च्या वतीने सुरू आहे.
लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे पुतळे लोहा शहरात झाले पाहिजे त्यांचा आदर्श प्रेरणा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच घेतली पाहिजे यासाठी लोहा न.पा. च्या वतीने महामानवाने पुतळे उभारणे सुरू आहेत असे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोहा न.पा. ला विविध विकास कामांसाठी आ.शामसुंदर शिंदे यांनी शिफारस केल्यामुळे ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे त्यामुळे आ.शामसुंदर शिंदे यांचे ही मी लोहा न.पा वतीने आभार मानतो असे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले.
यावेळी मुख्याधिकारी गंगाधर पेंटे,उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक संदीप दमकोडवार, नगरसेवक केतन खिल्लारे, नगरसेवक जीवन चव्हाण, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक येलरवाड, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, आदी उपस्थित होते.
वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. लोहा न.पा.त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या न.पा. च्या सर्वसाधारण सभेत समतेचे पुरस्कर्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यामुळे लोहा शहर व तालुक्यातील सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने लोहा न.पा.त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांची सदिच्छा भेट घेऊन वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक केशवराव शेटे,शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनमंत भाऊ लांडगे,शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोडके, दत्ता शेटे, मल्लिकार्जुन अप्पा शेटे, राजू शेटे, लक्ष्मण अप्पा कांजले, पत्रकार बाळासाहेब कतूरे, पिंटू वडे, काशिनाथ शेटे, सरपंच मारोती सोनवळे, ज्ञानेश्वर घोडके, मल्लिकार्जुन कहाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे मनोहर भोसीकर, शिवसेनेचे धुराजी पाटील नांवदे, बबनराव नांवदे यांच्या सह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होता.