
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कंत्राटी कामगारांनी मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचे मानले आभार
दि. २२ मे. ताडाली येथील श्री सिद्धबली इस्पात लिमिटेड कंपनी मध्ये काम करित असलेल्या कंत्राटी कामगारांना वेतन वाढ होण्यास अनेको प्रयत्न सुरु होते. परंतु कामगारांना निराशा हाती लागली कंपनी व्यवस्थापन तसेच कंत्राटदारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे हताश झालेल्या कामगारांना न्याय मिळवून देण्यास मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा मार्गदर्शनाखाली माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी कामगाराचा समस्यांचा पाठपुरवा केला. कामगारांना वेतन कमी मिळणे तसेच मासिक वेतनाची रक्कम बँक खात्यात जमा न करणे. सुरक्षासंबंधी साहित्य पुरवढा न करणे अश्या विविध विषयाला अनुसरून मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कामगार आयुक्त व जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन कंत्राटी कामगारांना तत्काळ न्याय मिळावा या करिता प्रयत्न सुरु केले होते. सदर प्रयत्नांना यश मिळाले असून आज कंपनीतोल कंत्राटी कामगारांना ४७२ रु प्रमाणे मिनीमम वेजेस, संरक्षण किट, तसेच पीएफ व ESIC च्या सुविधा पुरवण्यात येणार आहे. आज कंपनी व्यवस्थापकाशी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. सदर बैठकी मध्ये मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार विधान सभा क्षेत्र बल्लारपूर, माजी जि.प अध्यक्ष देवराव दादा भोंगळे,ड्रा ,मंगेश गुलवाडे भाजपा अध्यक्ष महानगर चंद्रपूर, माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले, सरपंच संजय उकीनकर यांची उपस्थिती होती. कंत्राटी कामगारांनी मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचे आभार मानले. कंपनी कंत्राटी कामगारांना न्याय मिळून देण्यास मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार मोठा वाटा आहे. कंत्राटी कामगारान मध्ये साध्य उत्साहाचे वातावरण आहे. विजय खापणे, विवेक चांदेकर, अशोक आदे, प्रमोद बनकर, अविनाश चौधरी, उत्तम टेकाम,तुषार बल्की, विशाल खांडारकर, प्रदीप तलांडे, अमर खापणे, पियुष पारखी, स्वप्नील रामटेके, सौरभ सारंगधर, स्वप्नील गेडाम, अविनाश नावतुरे, सुधाकर बावणे, सुनील दुडरे, गौरव वाडगुरे, स्वप्नील बरडे व इतर कंत्राटी कामगारांनी भाऊचे आभार मानले.