
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जेजुरी तीर्थक्षेत्राचे जतन व संवर्धन करणे तसेच मंदिराच्या संकुलाचे संवर्धन करतांना या परिसराचाही विकास करणे, भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे, जेजुरी व आसपासच्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करणे यासाठी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. यासंदर्भात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात सुमारे 110 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.