
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
किनवट तालुक्यातील मौजे इस्लापूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंगुताई नर्तावार यांनी ऑल इंडिया मास्टर गेम्स दिनांक १८/०५/२०२२ते २२/०५/२०२२ पासून असणाऱ्या खेळामध्ये महाराष्ट्र पोलीस विभाग नांदेड पोलीस स्टेशन इस्लापूर येथील गंगुताई नर्तावार चौथा ऑल इंडिया गेम्स मध्ये थाळीफेक भारतात दुसरा नंबर मिळवून विजय प्राप्त केला आहे.
गोळा फेक भारतात तिसरा नंबर येऊन तसेच १०० मिटर धावणे मध्ये यांनी१९सेकंद ८३ पॉईंट धावण्या मध्ये तिसरा क्रमांक मिळून विजय मिळवला आहे.
महाराष्ट्र नांदेड जिल्हा पोलीस स्टेशन इस्लापूर येथील पोलीस निरीक्षक रघुनाथजी शेवाळे व पोलीस कर्मचारी वर्ग यांच्याकडून शुभेच्छा चा वर्षा होत आहे.