
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी- सुनिल झिंजूर्डे पाटिल
मराठवाड्यातील क्रमांक दोनची कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या लासूर स्टेशन येथील बाजार समितीच्या अख्त्यारीतील कांदा मार्केटच्या कांदा व्यापाऱ्यांनी सुरक्षेचे कारण देऊन कांद्याचा लिलाव सोमवारी बंद ठेवला होता, मात्र बाहेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना बंद बाबतची पुर्वसूचना नसल्याने पैठण, गंगापूर, कन्नड व इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र सकाळीच शिल्लेगाव पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घढू नये म्हणून स्वतः पोलीस निरीक्षक एक उपनिरीक्षक तर दहा पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता व कांदा मार्केटच्या मुख्य गेटला ताळे ठोकल्याने शेतकरी गेटपासूनच माघारी निघत होते. याबाबतची माहिती शेतकरी नेते संतोष पाटील जाधव, आ.प्रशांत बंब यांचे स्वीय सहाय्यक तथा धामोरीचे उपसरपंच रवी पाटील चव्हाण, भाजपयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील जाधव यांना शेतकऱ्यांनी दिली असता बाजार समितीच्या मुख्य कार्यालयायात त्यांनी ठिय्या मांडला व सचिव कचरू रणयेवले यांना धारेवर धरून तात्काळ लिलाव पुन्हा चालू करण्याचे लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी ऐन हंगामात शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणुन सोमवार दि. २३/५/२०२२ रोजी कांदा मार्केट बंद न ठेवता कांदा खरेदी चालु ठेवावी असे म्हटले होते. तरीही शेतकरी वर्गाचा विचार न करता कांदा मार्केट बाजार समितीने बंद ठेवले व बाजार समिती कार्यालयाकडुन कुठलीही पूर्वसूचना न देता अवघ्या एक दिवसाची मुदत देत सोमवार दि. २३ मे रोजी बाजार समितीच्या कांदा खरेदी बंद ठेवण्यात आली. हा निर्णय अत्यंत चुकीचा घेतल्याने ऐन पावसाच्या तोंडावरच बि/बियाने, खते खरेदी करण्यासाठी बळीराजा मिळेल त्यां भावाने कांदा विक्रीसाठी आणत होता सध्या पावसाचे ढग असूनही कांदा साठवण्याची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्याचा कांदा शेतातच पडुन असल्यामुळे आधीच त्यांचा जीव तंगणीला आहे आणि शेतकऱ्यानां शेतीचेपेरणीचे दिवस तोंडावर असल्यामुळे खते, बियाणे, औषधी, सह शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्याची लगबग असतानांच कांदा खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समीतीने घेतल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण होऊन शेतकरी हवालदिल झाले, असूनही सोमवारी दुपारपर्यंत कांदा मार्केट शंभर टक्के बंद होते. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला येऊन आक्रमक झाला. त्यामुळे बाजार समितीचे सचिव कचरू रणयेवले यानी बंदची सपसेल माघार घेत शेतकऱ्यांना लेखी पत्रच दिले व ज्या शेतकऱ्यांचा कांदा मार्केटमध्ये आला असेल तो खरेदी करण्याचा निर्णय घेतला व तसे लेखी पत्रही शेतकऱ्यांना देण्यात आले.
दरम्यान सकाळी बाजार समितीत व्यापाऱ्यांनी बंद पाळल्याने शुकशुकाट होता मात्र दुपारनंतर शेतकरी आक्रमक झाल्याने पुन्हा लिलाव सुरळीत झाला होता मात्र कांद्याची आवका मोठ्या प्रमाणात घटली होती.
संतोष पाटील जाधव :- शेतकऱ्यांना कुठलीही पुरवसूचना न देता बाजार समितीने व्यापाऱ्यांपुढे अक्षरशः गुडघे टेकले व कांदा मार्केट बंद ठेवले होते. मुळात मार्केट बंद ठेवण्यासाठी बाजार समितीला आठ दिवस अगोदर पत्र देणे बंधनकारक असते किंवा तरीही मार्केट बंद ठेवायचे असल्यास व खरेदीदार व्यापारी संपवार गेल्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी/विक्री (विकास व विनियमन )अधिनियम 1963 अन्वये नाशवंत अथवा टिकाऊ शेतीमाल खरेदी करणारा कुठलाही लायसनधारक व्यापारी अथवा त्यांचा वर्ग संपवार गेला तर कायम चालू असलेला व्यापार चालू ठेवण्यासाठी बाजार समिती सक्षम अशी पर्यायी व्यवस्था करण्यास लसक्षम आहे असे समजण्यात येईल असा कायदा अधिनियम आहे मात्र हा अधिनियम बाजार समिती न पाळता शेतकऱ्यांच्या आर्थिक मुळावर कुऱ्हाड मारण्याचे पाप करत होती. मात्र शेतकऱ्यांच्या दबावापुढे अखेर बाजार समिती सपसेल माघारी फिरली व कांदा लिलाव चालू करण्याचे लेखी पत्रा शेतकऱ्यांना दिला हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे.
कृष्णा कऱ्हाळे (उपाद्यक्ष, कांदा व्यापारी असोसिएशन )आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर कांदा मार्केट बंद ठेवले होते आमचा आकस हा शेतकऱयाविषयीं नसून आमच्या एका व्यापाऱ्याला एका वाहनचालकाने दगडाने मारहाण केली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने बाजार समितीने सुरक्षा द्यावी म्हनून लेखी पत्र व्यापारी वर्गाने देऊन एकदिवसीय बंद पुकारला होता त्यात शेतकऱ्याची अडवणूक करण्याचा प्रश्नच नाही.
विकास कोरडे (शेतकरी, बिडकीन ):- माझ्या बहिणीचे लग्न दोन दिवसावर आल्याने मी एक ट्रॉली भरून कांदे विक्रीसाठी लासूर स्टेशनला आणला होता मात्र मार्केट बंद असल्याची कल्पना नव्हती त्यामुळे कव्डीमोल भावात मी ट्रॉलीभर कांदा बाहेरच्या व्यापाऱ्याला विकला ही शेतकऱ्याची एकप्रकारे अडवणूक आहे.