
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याशी वैयक्तिक वैर घेतले आहे व केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी पकडून ते वैयक्तिक वैर पुढे नेत आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांना ‘फतवे’ देण्याचे काम फडणवीस करतात यात त्यांना आज मजा वाटत आहे पण हाच खेळ भविष्यात त्यांच्यावर उलटू शकतो.’ असा इशाराच शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून फडणवीसांना दिला आहे.
नवाब मलिक यांच्यावरील कारवाई ही वैयक्तिक सूडातूनच करण्यात आली. मलिक यांनी अशा काही प्रकरणांना हात घातला की, त्यामुळे भाजपची वाट बिकट झाली होती म्हणून त्यांच्यावर केंद्रीय तापस यंत्रणांनी कारवाई केली. असा आरोप आता शिवसेनेने केला आहे.