
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
नांदेड – लातूर या राष्ट्रीय महामार्गावर व शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लोहा बस स्थानकात सुविधेचा अभाव असुन अनेक खुर्ची स्टॅण्ड मोडून पडले आहेत अनेक पंखे नादुरुस्त आहेत अस्वच्छता व दुर्गंधीचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे तेव्हा याकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी तात्काळ घेऊन लोहा बस स्थानकात सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी स्वाभिमानी भीमसेनेच्या वतीने स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा -कंधार विधानसभा अध्यक्ष विलास सावळे यांनी केली आहे.
लोहा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या लोहा बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खुर्च्यांची मोडतोड झाली आहे त्यामुळे अनेक प्रवाशाना ताटकाळत उभे राहावे लागत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गर्मीचे प्रमाण वाढले आहे पण लोहा बसस्थानकात अनेक पंखे हे बंद आहेत ते शोभेचे वास्तू बनल्या आहेत तेव्हा याकडे ही एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी तात्काळ देऊन ते दुरुस्त करावे तसेच बस स्थानक व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे दुर्गंधी येते आहे अनेक जण उघड्यावर लघुशंका करीत आहेत तसेच लोहा बस स्थानकातील शौचालयांचे पाणी व घाण हे लोहा बस स्थानकातील रिकाम्या जागेत खोदकाम करून उघड्यावर खडा सोडून त्यात शौचालयातील पाणी सोडले आहे त्यामुळे त्यांची दुर्गंधी लोहा बस स्थानकात पसरली आहे तेव्हा तो उघड्यावरचा खड्डा बुजवून बांधकाम करुन हौदात पाणी सोडावे व लोहा बस स्थानकातील खुर्च्या पंखे दुरुस्त करून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा-कंधार विधानसभा अध्यक्ष विलास सावळे यांनी केली आहे.