
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: पुण्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दापोडीतून एका तरुणाला अटक केली आहे. हा तरुण संशयित दहशतवादी असल्याचा दावा करण्यात येत आहे.दापोडी परिसरातून जुनेद मोहोम्मद या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तो २८ वर्षे वयाचा असून तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील आहे.हा दहशतवादी काश्मीरमधील संघटनेच्या संपर्कात होता
काश्मीरमधील ‘गजवाते अल हिंद’ या अतिरेकी संघटनेकडून त्याला फंडींगचे काम देण्यात आले होते. नव युवक अतिरेक्यांना जुनेद मोहम्मद हत्यारे कशी चालवायची याचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत असत. देशात घातपात किंवा अतिरेकी हल्ले कोठे आणि कसे करायचे यासंबंधीच्या नियोजन समितीत सुध्दा तो कार्यरत होता. जुनेद ला या गंभीर गुन्ह्यात आज पोलिसांनी अटक करून पुणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे